नवचैतन्य टाईम्स वाई {प्रा. संभाजी लावंड}:-वाई नगरपरिषदेच्या संत गाडगे महाराज नगरपालिका शाळा क्रमांक ६,वाई येथील वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.सुजाता भीमराव यादव यांना अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्या मध्ये प्रतिष्ठेचा' राज्य स्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार' दिनांक. २४/११/२०२६ रोजी प्रदान करून गौरविण्यात आले, आणि नगरपालिका शाळा क्रं पाच वाईच्या अध्यापिका सौ. जयश्री शशिकांत क्षीरसागर मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी कामगार मंत्री मा. आकाश दादा फुंडकर ,अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे,आमदार साजित खान पठाण, आमदार धिरज लिंगाडे आमदार किरण सरनाईक , आमदार डच्चू कडू, आमदार नितीन देशमुख, राज्याध्यक्ष श्रीअर्जुन कोळी ,यांची प्रमुख उपस्थिती होती.दोन्हीआदर्श शिक्षिकांचे नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री साईनाथ वाळेकर साहेब ,सौ. सुजाता गायकवाड केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक श्री विकास जाधव, श्री सुरेश दुधाने,श्री दिनकर दळवी, श्री महादेव अडागळे, श्री तेजस भोसले,श्री श्याम पवार, श्री विलास कोळी,श्री रमेश डोईफोडे, श्री मनोहर अलबाड,श्री राहुल क्षीरसागर आदिंची त्यांचे अभिनंदन केले.सदर कार्यक्रम हा अकोला येथे आयोजित करण्यात आला.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे योगदान, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि समर्पित सेवा भाववृत्ती ही योग्य पोचपावती आहे.त्यांच्या या यशामुळे वाई शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचा नाव लौकिक राज्यस्तरावर उंचावला असून, नगरपालिका शाळा क्रमांक ६ आणि संपूर्ण वाई शहरासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.सदर सौ. सुजाता भीमराव यादव मॅडम व सौ.जयश्री क्षीरसागर यांचे या मानाच्या पुरस्कारा बद्दल मनः पूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.!

