NCT NCT सलगरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान शिबिराचे आयोजन पात्र रुग्णांवर लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत

सलगरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान शिबिराचे आयोजन पात्र रुग्णांवर लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी{रामचंद्र कोरे-माळी}:-सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली संत निरंकारी मिशन शाखा सलगरे च्या वतीने भव्य मोफत नेत्र तपास शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरात आधुनिक जपानी संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे नेत्र तपासणीसह मोतीबिंदू तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सातारा-सांगली झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे व ब्रांच मुखी संदीप साळुंखे यांनी दिली.हे शिबिर सलगरे या ता.मिरज पलुस (ता पलुस )विटा (ता.खानापुर )येथे शिबिराचे आयोजन केले आहे.                                                                              या शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन, पलूस येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन, विटा येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, तर रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन, सलगरे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर पार पडणार आहे.या शिबिरात सामान्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच आधुनिक संगणकीय उपकरणांच्या साहाय्याने डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या पात्र रुग्णांवर नेत्र रुग्णालयात लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि नेत्र तपासणी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नंदकुमार झांबरे यांनी केले आहे