नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी {रामचंद्र कोरे-माळी}:- अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष कै. शिवशंकर लिंबीतोटे यांची नात व सोलापूर महानगर पालिकेचे निवृत्त अभियंता व सहा. मुख्य लेखा परीक्षक राजेंद्र लिंबीतोटे यांची मुलगी डॉ. ऐश्वर्या वैशाली राजेंद्र लिंबीतोटे ही बी. ए. एम. एस. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिचा पुणे येथे झालेल्या पदवीप्रदान कार्यक्रमात सन्मान करण्यात आला पुणे येथील विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर येथे हा पदवीप्रदान कार्यक्रम संपन्न झाला. 12 देशात आयुर्वेद नेणारे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अविनाश लेले यांच्या हस्ते व महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव श्री. अनिल गुजर यांच्या अध्यक्ष ते खाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी एकूण 59 डॉक्टरांचा पदवीप्रदान करून सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉक्टर ऐश्वर्या वैशाली राजेंद्र लिंबीतोटे हिचा व तिच्या आई-वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.डॉ. ऐश्वर्या हिच्या यशाबद्दल अक्कलकोट, सोलापूर सह सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. आयुर्वेद क्षेत्रात तिने अशीच उत्तुंग भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून देण्यात येत आहेत.
डॉक्टर ऐश्वर्या लिंबीतोटे बी.ए.एम.एस. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ; पुण्यात पदवीप्रदान सोहळ्यात सन्मान
November 27, 2026
