NCT NCT जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक नियुक्ती आदेश वाटप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक नियुक्ती आदेश वाटप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर{विजय चौगुले}:-जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने प्राथमिक  शाळांसाठी नवनियुक्त शिक्षण सेवकांना नियुक्ती आदेश वाटपाचा भव्य व प्रेरणादायी सोहळा नुकताच जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . विशाल नरवाडे ( जिल्हा परिषद सांगली) श्री . हजारे (शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली), सौ. सविता पाटील अध्यक्ष (जिल्हा परिषद सांगली), सौ. सावित्रीताई रवी पाटील( सभापती, महिला बालकल्याण समिती जिल्हा परिषद सांगली) व इतर वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मान्यवरांचे मार्गदर्शन : 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षणाधिकाऱ्यांनी नवनियुक्त शिक्षण सेवकांचे अभिनंदन केले. आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्यांनी उपदेश केला की, "शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे." ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याची व त्यांच्यामध्ये संस्कार रुजवण्याची मोठी जबाबदारी आता या नवीन शिक्षण सेवकांच्या खांद्यावर आहे. त्यांनी आपली नोकरी केवळ एक रोजगार न मानता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे एक पवित्र कर्तव्य म्हणून पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नियुक्ती पत्र स्वीकारल्यानंतर नवनियुक्त शिक्षण सेवक सौ. राणी चिदानंद सुतार म्हणाले की, "आमच्या कष्टाचे व अभ्यासाचे चीज झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करू."सर्व उपस्थितांनी नवनियुक्त शिक्षण सेवकांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.