NCT NCT राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला पाचगणीत उत्स्फूर्त प्रतिसाद; 115 टक्के उद्दिष्ट पूर्ण

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला पाचगणीत उत्स्फूर्त प्रतिसाद; 115 टक्के उद्दिष्ट पूर्ण

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):-राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत 28 जून 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचगणी येथे बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस पाजून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.        महाबळेश्वर तालुका पंचायत समितीच्या सभापती शकुंतलाताई चोरमले, पंचायत समिती सदस्या वंदनाताई भिलारे, पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे आणि जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे यांच्या शुभहस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले.                                                                        यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिला बेलोशे, डॉ. विशाल टकले, आरोग्य निरीक्षक संजय चव्हाण, आरोग्य सहाय्यक विजय गोंजारी, औषध निर्माण अधिकारी दिलीप यादव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी चेतन रांजणे, आरोग्य सहायिका तम्मना काझी, रुपाली नायकवडी, आरोग्य सेवक रोहित निकाळजे, आरोग्य सेविका श्रुती मोरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.डॉक्टर मिथिला बेलोशे यांनी सांगितले की, या अभियानासाठी महाबळेश्वर तालुक्यात एकूण 38 बूथ उभारण्यात आले होते. एरंडल, नावली, धारदेव, आढाळ, उंबरी, धावली यांसारख्या दुर्गम भागांसह एसटी स्टँड, दांडेघर नाका, पारशी पॉइंट, टेबल लँड आणि संजीवन नाका येथेही बालकांना पोलिओ लसीचे डोस देण्यात आले. या अभियानात 1,790 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात 2,078 बालकांना पोलिओ लस देण्यात आली, म्हणजेच 115 टक्के उद्दिष्ट पूर्ण करून पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राने उल्लेखनीय कामगिरी केली.