NCT NCT कराड तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा

कराड तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा

 

नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):-कराड तालुक्यात आज दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वत्र गारवा पसरला आहे. शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसामुळे शेतजमिनींना ओलावा मिळाला असून पिकांच्या वाढीस चालना मिळणार आहे. संध्याकाळी अनेक नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला. बाजार पेठांमध्येही प्रसन्न वातावरण पाहायला मिळाले. हवामान विभागाने पुढील काही दिवस कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.