नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सांगली-सातारा विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील (दादा ) कदम यांनी खरसुंडी (ता आटपाडी) गावास भेट दिली.यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.गावात येताच त्यांची सुवाद्यासह मिरवणूक काढण्यात आली.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मुख्य सत्कार समारंभात हा भाजपाचे जिल्हा महामंत्री विलासराव काळेबाग व सरपंच धोंडीराम इंगवले यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळसह यथोचितपणे करण्यात आला.यावेळी माजी सरपंच अर्जून पुजारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी श्री सिद्धनाथ मंदिरास भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, ग्रामपंचायत सदस्य किरण पुजारी, विक्रम भिसे,छगन साळुंखे, एकनाथ भोसले,किरण भांगे, तानाजी क्षिरसागर, तानाजी कटरे, संजय कोळेकर, तानाजी पुजारीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो :- खरसुंडी (ता आटपाडी) येथे आमदार धैर्यशील कदम यांनी सध्दिच्छा भेट दिली सोबत विलासराव काळेबाग व इतर
