नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :-कवठेमहांकाळ तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊसच न झाल्याने अद्यापही खरीप हंगामातील कशल्याच पेरण्या सुरू झाल्या नाहीत.जून संपून जुलै महिना आला तरी शेतजमिनीत पुरेशी ओल नसल्याने अद्यापही शेतकरीराजा मोठ्या व दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत.अशा परिस्थितीत घाटनांद्रे (ता.कवठेमहांकाळ) येथील शेतकरी महादेव रामचंद्र सपकाळ यांच्या शेतात मात्र एक अनोखी घटना अनुभवास येत आहे. सपकाळ यांच्या अर्धा एकर क्षेत्रात सन २०२५-२६ मधील रब्बी हंगामात घेतलेल्या भुईमूग पिकातील पीक उपडून काढले पण काही शेंगा काढण्याविना जमिनीत तसाच राहिल्या होत्या.त्या आता (२०२६-२७) मध्ये सुरवातीला झालेल्या उन्हाळी अल्प पावसानंतर त्या शिल्लक शेंगांना अंकुर फुटून रोपे उगवून आली आहेत.तालुक्यात तसेच सदर परिसरात उपयुक्त पावसाविना खरीप हंगामातील पेरण्याच झालेल्या नसताना,गेल्या रब्बी हंगामातील भुईमूग बियाणे उगवल्याने परिसरात एक याची चर्चा सुरू आहे. सध्या पावसाअभावी शेतकरी पेरणीसाठी थांबले आहेत.जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच खरीप पिकांच्या पेरण्या सुरू होणार आहेत. दरम्याने, सपकाळ यांच्या शेतात न पेरता भुईमूगाची अगदी उत्कृष्टरित्या उगवण तीही नैसर्गिकरीत्या घडलेली आगळीवेगळी घटना ठरली असून,ती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत आहेत.
फोटो :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील महादेव सपकाळ यांच्या शेतात मागील रब्बी पेरणीतील सध्या खरीपात आलेले भुईमूग पीक.फोटो- जालिंदर शिंदे
