NCT NCT समतेचा सागर,परिवर्तनाचा जागर म्हणजे लोकराजा,राजर्षी शाहू महाराज होय- प्रा.अर्जुन कर्पे

समतेचा सागर,परिवर्तनाचा जागर म्हणजे लोकराजा,राजर्षी शाहू महाराज होय- प्रा.अर्जुन कर्पे

कवठेमहांकाळ येथील पंचायत समिती सदस्य प्रा.अर्जुन कर्पे यांनी दिला प्रतिमा पूजनाचा कर्मचाऱ्यांना मान                          पंचायत समितीच्या इतिहासात कर्मचाऱ्यांच्या हस्ते प्रथमच प्रतिमा पूजन ,आणि दिला गेला मान

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-आज कवठेमहांकाळ पंचायत समिती मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त पंचायत समिती मध्ये राजर्षी शाहू महाराज यांना एक आदर्शवत अभिवादन करण्यात आले.पंचायत समिती चे सदस्य प्रा अर्जुन कर्पे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात येत होते.परंतु शिव ,फुले,शाहू,आंबेडकर विचारांचे पाईक असणारे,प्रा.अर्जुन कर्पे यांनी आज राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हे आपल्या पंचायत समिती शिपाई यांच्या हस्ते करण्यात यावे अशी प्रत्यक्ष कृती करणारी भूमिका घेतली.व  पंचायत समिती चे शिपाई धोंडीराम काका मोरे,सलीम भैया शेख ,गणेश काका परीट यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.  राजर्षी नी घालून दिलेला समतेचा विचार  खऱ्या अर्थाने जपण्याचे काम पंचायत समिती सदस्य प्रा.अर्जुन कर्पे सर यांनी केले.यावेळी पंचायत समितीचे अधिकारी मोहनराव वाघमोडे, सागर बजबळे  महादेव (नाना)पाटील , मारुती चव्हाण , दशरथ पवार , चांदोरे आदी मान्यवर इत्यादी उपस्थित होते.