नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करत समाजसेवेचे भक्कम कार्य उभे करणारे शहानवाज चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांनी समाजात वेगळी छाप निर्माण केली आहे. प्रेमळ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि निस्वार्थ समाजसेवेची तळमळ यामुळे शहानवाज चौधरी यांच्याबद्दल सर्व स्तरांत आदराची भावना आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक होवो, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आल्या
संघर्षातून घडलेले समाजसेवक शहानवाज चौधरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
June 30, 2026