नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद ):-कमी वयात संघर्षाची वाट चालत स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व घडवणारे, जिद्द, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ समाजसेवा या गुणांच्या जोरावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणारे अजित कासुड्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचा आनंदी चेहरा, मनमोकळा स्वभाव, प्रसंगी कठोर भूमिका घेण्याची तयारी आणि मनाने अत्यंत प्रेमळ असलेले व्यक्तिमत्त्व यामुळे ते अनेकांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदतीची गरज आहे, हे समजताच कोणताही वेळ, दिवस किंवा रात्र न पाहता मदतीसाठी धावून जाणे ही त्यांची ओळख बनली आहे. समाजातील गरीब, गरजू, संकटग्रस्त आणि वंचित घटकांना सामाजिक आधार देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अनेकांना मदत करूनही त्याचा कधीही गाजावाजा न करणे किंवा त्यातून प्रसिद्धी अथवा वैयक्तिक फायद्याची अपेक्षा न ठेवणे, ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू मानली जाते. संघर्षातून मिळालेल्या अनुभवामुळे प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता त्यांच्यात आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सकारात्मक कार्य करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. सर्व समाजाला समानतेची वागणूक देणे, मतभेद बाजूला ठेवून माणुसकी जपणे आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी योगदान देणे, ही त्यांची कार्यशैली अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अजित कासुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार, सहकारी तसेच असंख्य हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू राहो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आल्या.
