नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी सत्संग भवन तासगाव,सांगली व कवठेमहांकाळ या ठिकाणी दिनांक27, 28,29 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून व संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. त्या मध्ये एकूण 1351 नागरिकांचे संगणकीय तंत्रज्ञानाच्या साह्याने डोळे तपासण्यात आले व 446 जणांना चष्मे देण्याचे नियोजन केले.त्यापैकी 189 हून अधिक रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आल्याने त्यांचे सुदर्शन डोळ्याच्या हॉस्पिटल सांगली या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करत आहेत.तसेच काही रुग्णांना तपासून नंतर आवश्यकतेनुसार औषध उपचार करण्यात आला. या शिबिरात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या सहकारी मुंबईहून प्रेमा ओबेरॉय या डोळ्याच्या डॉक्टराची टीम घेऊन सांगली येथे डोळ्याच्या तपासणीसाठी आल्या व त्याच बरोबर सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल सांगली येथून डॉ. सुरेश वाघ व त्यांचे टीमने सुंदर प्रकारे नेत्र तपासणी केली. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या सहकारी प्रेमा ओबेरॉय मुंबई या बोलताना म्हणाल्या की संत निरंकारी मिशन झोन सातारा 34A चे झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे जी यांच्या प्रयत्नातून या झोन मध्ये डोळे तपासणी हे खूप आवश्यक असून ते प्रत्येक जिल्हा व तालुका व खेडोपाड्यामध्ये व्हावे या अनुषंगाने आपण तासगाव सांगली कवठेमंकाळ व इथून पुढे या झोन मध्ये अनेक ठिकाणी हे शिबिर वेळेनुसार घेण्यात येईल. अशी माहिती दिली.या शिबीराचे नियोजन सांगली सेक्टर संयोजक जालिंदर जाधव व त्या त्या ब्रॅच मधील सर्व ब्रँच मुखी, सेवादल अधिकारी व सर्व सेवादल यांनी खूप छान पद्धतीने नियोजन केले.




