NCT NCT पाचगणीत मुसळधार पावसामुळे महाकाय वृक्ष कोसळला; मोठी दुर्घटना टळली

पाचगणीत मुसळधार पावसामुळे महाकाय वृक्ष कोसळला; मोठी दुर्घटना टळली


नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद ):-
पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दुपारी मोठी दुर्घटना घडता घडता टळली. पाचगणी–वाई मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन परिसरात उभा असलेला एक महाकाय वृक्ष अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.                                                           वृक्ष रस्त्यावर कोसळल्यामुळे दोन वाहने आणि एका चहाच्या टपरीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने वाहन चालक व नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते, वृक्ष कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याने काहींना सावध होण्याची संधी मिळाली.                          घटनेनंतर मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.स्थानिक नागरिक,नगर पालिका कर्मचारी,स्वयंसेवक आणि महावितरणच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वृक्ष हटविण्याचे काम सुरू केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.               या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पावसाळ्यात धोकादायक व जीर्ण वृक्षांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.